You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेच्या मुक्त पत्रकार शेली किटलसन यांचे इराकमध्ये अपहरण
अमेरिकेच्या मुक्त पत्रकार शेली किटलसन यांचे इराकची राजधानी बगदादमध्ये अपहरण झाले आहे. त्यांच्या अपहरणकर्त्यामधील एक संशयित इराण समर्थित कट्टरतावादी आहे असे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
शेली किटलसन या मुक्त पत्रकार आहेत. त्यांचे मंगळवारी (31 मार्च) सायंकाळी अपहरण झाल्याचे 'अल मॉनिटर' या माध्यमसंस्थेनी म्हटले आहे. ही शेली किटलसन या 'अल मॉनिटर'साठी वृत्तांकन करत होत्या.
किटलसन यांचे अपहरण झाल्यावर इराकच्या सुरक्षा दलातील अधिकाऱ्यांनी त्या वाहनांचा पाठलाग केला. त्यावेळी एका अपहरणकर्त्याची कार पलटली आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे.
हा ताब्यात घेण्यात आलेला संशयित अपहरणकर्ता इराण समर्थित कट्टरतावादी गट कतैब हिजबुल्लाशी संबंधित असल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
अमेरिकन पत्रकाराचे अपहरण झाल्याच्या वृत्ताला अमेरिकेचे स्टेट ग्लोबल पब्लिक अफेअर्सचे असिस्टंट सेक्रेटरी डायलन जॉनसन यांनी दुजोरा दिला आहे. पंरतु त्यांनी किटलसन यांचे नाव सांगितले आहे.
त्यांनी X वरील पोस्टवर म्हटले आहे की अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने संबंधित पत्रकाराला संभाव्य धोक्याची सूचना दिल्याची जबाबदारी पूर्ण केली होती. त्यांची लवकरात लवकर सुटका व्हावी यासाठी आम्ही FBIच्या संपर्कात आहोत.
बीबीसीला दिलेल्या प्रतिक्रियेत अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने म्हटले की, त्यांच्या गोपनीयता आणि सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही सध्या जास्त काही सांगू शकत नाही.
शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या हॉटेलजवळून त्यांचे अपहरण करण्यात आल्याची माहिती अल मॉनिटरने आपल्या वृत्तात दिली आहे. अल मॉनिटर ही माध्यम संस्था अमेरिकील आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की परराष्ट्र खात्याला त्यांच्या अपहरणाबद्दलची माहिती त्यांच्या सुटकेसाठी ते इराक सरकारच्या संपर्कात आहे.
शेली किटलसन यांच्या अपहरणामुळे धक्का बसला असून त्यांची सुरक्षितरीत्या सुटका व्हावी यासाठी अशी आशा त्यांना व्यक्त केली आहे.
बीबीसीची अमेरिकेतील सहकारी वृत्तसंस्था CBS ने सांगितले की शेली किटलसन यांच्या सुटकेसाठी स्थानिक अधिकारी उच्चस्तरावर प्रयत्न करत आहेत.
'धोक्याबाबत कल्पना देण्यात आली होती'
इराण समर्थित गटाकडून धोका असल्याचा किटलसन यांना अमेरिकन सरकारकडून स्पष्ट इशारा देण्यात आला होता, असे किटलसन यांचे इमरजन्सी काँटॅक्ट आणि CNN नॅशनल सेक्युरिटी अॅनालिस्ट अॅलेक्स प्लिटसास यांनी CBS ला सांगितले.
कतैब हिजबुल्ला महिला पत्रकाराचे अपहरण किंवा जीवे मारण्याची योजना आखत असल्याचा इशारा देण्यात आला होता.
किटलसन यांचे नाव कतैब हिजबुल्लाच्या यादीत असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते असे प्लिटास यांनी सांगितले. आणखी एका सुत्राच्या माध्यमातून या गोष्टीची पुष्टी करण्यात आली किटलसन यांना धोक्याबाबत कल्पना देण्यात आली होती. पण त्यांना वाटलं ही खोटी माहिती असेल.
इराकच्या गृह मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे : अपहरणकर्त्यांना अटक करण्यासाठी, त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी सुरक्षा दलाने तत्काळ मोहीम सुरू केली आहे. आम्ही अचूक माहितीच्या आधारावर काम करत आहोत.
त्यात त्यांनी असे म्हटले आहे : अपहरणकर्त्यांच्या वाहनांचा ठिकाणा आम्हाला लागला, त्यानुसार आम्ही त्यांचा पाठलाग करत होतो त्या प्रयत्नात एका अपहरणकर्त्याचे वाहन पलटले आणि त्याला ताब्यात घेतले.
या संशयिताची ओळख गृह मंत्रालयाने जाहीर केली नाही. त्यांनी अपहरणकर्त्याला 'अनोळखी व्यक्ती' असे संबोधले आहे.
संघर्षग्रस्त भागात किटलसन यांनी केले आहे वार्तांकन
किटलसन यांचे अपहरणकर्त्यांना शोधण्याचा आणि त्यांची सुरक्षित सुटका करण्याचा प्रयत्न सुरू आहे. अपहरणकर्त्यांना कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे.
किटलसन सध्या इटलीतील रोम इथे राहतात. त्यांनी अफगाणिस्तान, इराक आणि सिरियातील संघर्षावर वार्तांकन केले आहे. अनेक प्रकाशनासाठी लेखन केल्याचा उल्लेख त्यांच्या ट्विटर अकाउंटवरील बायोत त्यांनी केला आहे.
त्यांच्या अपहरणासंदर्भात FBI, राष्ट्रीय सुरक्षा परिषद, परराष्ट्र खाते, डेल्टा फोर्स आणि इराक दहशतवादविरोधी सेवा संपर्कात असल्याचे CBS च्या सुत्रांनी सांगितले.
एकेकाळी बगदाद हे अपहरणासाठी कुख्यात होते. पण गेल्या काही वर्षांत सुरक्षा व्यवस्थेत सुधारणा झाल्यानंतर अपहरणाच्या संख्येत घट झाली होती.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.