सीताराम येचुरी यांचा मुलगा आशिष येचुरी यांचा कोरोनामुळे मृत्यू

वाचन वेळ: 1 मिनिटे

मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांचे पुत्र आशिष येचुरी यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सीताराम येचुरी यांनी ट्वीटरवरून ही माहिती दिली आहे.

त्यांनी ट्वीट केलं आहे की, "कोरोनामुळे आज सकाळी माझा मोठा मुलगा आशिषचा मृत्यू झाला आहे. या कठीण काळात आम्हाला आशा दाखवणाऱ्या आणि आशिषची काळजी घेणाऱ्या सगळ्यांचे मी आभार मानतो."

वृत्तसंस्था PTIनं दिलेल्या माहितीनुसार, 9 जूनला आशिष 35 वर्षांचे होते. त्यांच्यावर गुडगावच्या मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. तसंच त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत होती.

मार्क्सवादी कम्यूनिस्ट पक्षानं आशिष यांच्या मृत्यूवर वक्तव्य प्रसिद्ध केलं आहे.

त्यात म्हटलंय, "सीताराम येचुरी आणि इंद्रायणी मजुमदार यांचा मुलगा आशिष यांच्या मृत्यूमुळे आम्हाला दु:ख झालंय. याप्रसंगी पक्ष येचुरी कुटुंबीयांसोबत आहे."

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी ट्वीट करत म्हटलं, "ही मनाला विचलित करणारी बातमी आहे. यापेक्षा मोठं नुकसान असूच शकत नाही. या वाईट काळात तुम्हाला ताकद मिळो."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)