विजय माल्ल्यांना 4 महिने तुरुंगवास आणि 2000 रुपये दंड

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, विजय माल्ल्या
वाचन वेळ: 2 मिनिटे

न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने विजय माल्ल्यांना 4 महिन्यांच्या तुरुंगवासासह 2 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने माल्ल्यांना चार आठवड्यांच्या आत व्याजासह 40 दशलक्ष अमेरिकन डॉलर परत जमा करण्यास सांगितले. तसे न केल्यास मालमत्ता जप्त केली जाईल, असाही इशारा दिलाय.

याप्रकरणी पुरेशी शिक्षा असली पाहिजे, असंही निरीक्षण न्यायालयानं नोंदवलं.

याआधी यूके हायकोर्टानं दिला घर जप्तीचा आदेश

भारतीय बँकांचं कर्ज न फेडता देश सोडणारे उद्योगपती विजय माल्ल्या युके हायकोर्टात एका महत्त्वाच्या खटल्यात पराभूत झाले. त्यांचं लडनमधलं घरं बँक जप्त होऊ शकतं, असं कोर्टानं जानेवारी महिन्यात सांगितलं.

स्विस बँक यूबीएस बरोबर सुरू असलेल्या वादावर जानेवारी महिन्यात व्हर्च्युअली सुनावणी झाली होती.

यावर निर्णय देताना न्यायाधिशांनी म्हटलं की, "बँकेकडून घेतलेलं 2.04 कोटी ब्रिटन पाऊंडचं कर्ज फेडण्यासाठी माल्ल्या कुटुंबाला आणखी वेळ देण्यासाठी काहीही ठोस कारण नाही. दुसऱ्या पक्षाचा युक्तिवाद योग्य असून त्यांना आणखी वेळ दिल्याने काही फायदा होईल, असं वाटत नाही."

जजने विजय माल्ल्या यांची विनंती फेटाळली. "या प्रकरणी अपीलची परवानगी दिली जात नाही. याचा स्पष्ट अर्थ म्हणजे या प्रकरणी स्टेचा आदेश दिला जाऊ शकत नाही," असं जज म्हणाले.

कोर्टाच्या आदेशानंतर आता बँक ही संपत्ती जप्त करून कर्जाची भरपाई करू शकते. बँक लवकरात लवकर कोर्टाच्या आदेशाचं पालन करेल, असं बँकेच्या वकिलांनी म्हटलं होतं.

विजय माल्ल्या यांचं हे घर 'अत्यंत मौल्यवान मालमत्ता' असल्याचं कोर्टात सांगण्यात आलं. त्याचं मूल्य हे, लाखों पाऊंड असू शकतं. माल्ल्या यांची कंपनी रोझ कॅपिटल व्हेंचर्सने हे घर गहाण ठेवून यूबीएस बँकेकडून कर्ज घेतलं होतं.

विजय माल्ल्या मार्च 2016 ला भारत सोडून ब्रिटनला गेले होते. त्यांनी किंगफिशर या एअरलाईन कंपनीसाठी बँकांकडून कर्ज घेतलं आणि ते न फेडताच विदेशात निघून गेले, असा त्यांच्यावर आरोप आहे.

कर्जाची ही रक्कम जवळपास 10 हजार कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं. किंगफिशर एअरलाइन अत्यंत दूरवस्थेनंतर बंद झाली होती.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)