शाहू महाराज स्मृतिदिन: 100 सेकंद स्तब्ध राहून शाहू महाराजांना अनोखी मानवंदना

फोटो स्रोत, BBC/swati patil

वाचन वेळ: 2 मिनिटे

राजर्षी शाहू महाराज यांच्या 100 व्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरात आज (शुक्रवार, 6 मे) अनोख्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली.

या उपक्रमाअंतर्गत सकाळी 10 वाजता राज्यातील सर्व नागरिकांनी 100 सेकंद स्तब्ध राहावं, असं आवाहन कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं होतं. त्यानुसार नागरिकांनी आहे त्याठिकाणी 100 सेकंद स्तब्ध उभे राहून या उपक्रमात सहभाग नोंदवला.

या उपक्रमात जिल्ह्यातील खासदार, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, संस्था, संघटना, मान्यवर व्यक्ती , शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यासह कोल्हापूर चे नागरिक सहभागी झाले. शहरातील चौकाचौकात तर जिल्ह्यातील गाव खेड्यामध्ये लोकांनी शाहू महाराजांना अभिवादन केले.

फोटो स्रोत, BBC/swati patil

या निमित्ताने शाहू महाराजांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन कोल्हापुरात करण्यात आले आहे.

राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म 26 जून 1874 रोजी कोल्हापुरात झाला होता. तर त्यांचं निधन वयाच्या 47व्या वर्षी 6 मे 1922 रोजी मुंबईत झालं होतं.

फोटो स्रोत, BBC/swati patil

शाहू महाराजांच्या निधनाला आज 100 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संपूर्ण कोल्हापूरसह राज्यभरातील नागरिकांनी 100 सेकंदासाठी स्तब्ध राहून त्यांना मानवंदना द्यावी, असं आवाहन प्रशासनाने केलं होतं.

व्हीडिओ कॅप्शन, राजर्षी शाहूंना वंदन करण्यासाठी कोल्हापूरमध्ये अनोखा उपक्रम

ही स्तब्धता म्हणजे, राजर्षी शाहू महाराजांना त्यांच्या 100 व्या स्मृती दिनानिमित्त केले जाणारे सामूहिक वंदन असणार आहे. सर्व व्यवहार 100 सेकंद थांबून लोकांनी ते असतील त्या ठिकाणी हे स्तब्धता रुपी वंदन द्यावं असा हा उपक्रम आयोजित करण्यात आला.

फोटो स्रोत, Courtesy : Facebook/Indrajit Sawant

शाहू महाराजांनी समाजातील दीनदुबळे आणि वंचितांसाठी जे प्रचंड मोठं कार्य केलं, त्याचं यावेळी स्मरण केलं जाणार आहे. शाहू महाराजांच्या आठवणींना उजाळा मिळण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला असल्याचं जिल्हा प्रशासनाने सांगितलं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)