एसटी कर्मचारी संप मागे घेण्याचे सरकारचे आवाहन, 28 टक्के महागाई भत्ता देण्याची तयारी

वाचन वेळ: 1 मिनिटे

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बोनस आणि वेतनवाढीसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी (एसटी) बेमुदत संप पुकारला होता. हा संप मागे घेण्याचे आवाहन राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे.

"कर्मचाऱ्यांच्या दोन प्रमुख मागण्या आम्ही मान्य केल्या आहेत तेव्हा हा संप मागे घेतला जाईल असा विश्वास आम्हाला वाटतो," असं परब म्हणाले.

28 टक्के महागाई भत्ता, वाढीव घरभाडे भत्ता आणि वेतनवाढ या मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. या संपामुळे सणा-सुदीला घरी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले.

नांदेड जिल्ह्यातही एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. जिल्ह्यातील सर्व एस. टी. सेवा सकाळपासून ठप्प झाल्या होत्या.

एस. टी. कर्मचाऱ्यांनी आज अचानक संप पुकारला. त्यामुळे संपाबाबत माहिती नसलेले अनेक प्रवासी बस स्टॅंडवर आले होते.

एस. टी. च्या सर्व संघटना या संपात सहभागी झाल्या होत्या. या संपाची कुठलीही कल्पना नसल्याने नेहमीप्रमाणे प्रवासी बस स्थानकात दाखल झाले. पण बसेस बंद असल्याने प्रवाशी खोळंबल्याचं दिसून आलं.

ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणारी एस. टी. हीच मुख्य सेवा असल्याने अनेक प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले.

फोटो स्रोत, Adv. Anil Parab/facebook

फोटो कॅप्शन, अनिल परब

दिवाळीनंतर वेतनवाढीवर चर्चा करण्यात येईल असं अनिल परब म्हणाले.

माध्यमांशी बोलताना परब म्हणाले, की एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणेच 28 टक्के महागाई भत्ता देण्यात येणार आहे. याआधी एसटी कर्मचाऱ्यांना 12 टक्के महागाई भत्ता देण्यात येत होता पण आता 28 टक्के भत्ता देण्यात येईल असं परब यांनी सांगितले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)