Gang Rape : पुष्पक एक्स्प्रेसमध्ये तरुणीवर बलात्कार, 4 जणांना अटक

वाचन वेळ: 1 मिनिटे

शुक्रवारी 8 ऑक्टोबरला मुंबईला येणाऱ्या लखनऊ - मुंबई पुष्पक एक्स्प्रेसमध्ये इगतपुरी ते कसारा प्रवासादरम्यान 8 जणांनी एका तरुणीवर बलात्कार केल्याचं प्रकरण समोर आलं आहे.

हे 8 जण इगतपुरीला ट्रेनमध्ये चढले आणि त्यांनी जवळपास 20 प्रवाशांना लुटल्याचं पोलिसांनी म्हटलंय. ज्या प्रवाशांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्यांना मारहाण करण्यात आली. यामध्ये 5 ते 6 जण जखमी झाले आहेत.

लुटमार करणाऱ्या याच टोळीने ट्रेनमधल्या एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केले. ट्रेन इगतपुरीहून कसाऱ्याला पोहोचेपर्यंत सुमारे अर्धा तास लूटमार - बलात्कार सुरू होता, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ही तरुणी 20 वर्षांची आहे.

याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालीद यांनी सांगितलं, "आरोपी इगतपुरी रेल्वे स्टेशनवर टेृनमध्ये चढले. गाडी घाटात पोहोचल्यानंतर त्यांनी लूट सुरू केली. टेृनच्या D-2 बोगीमध्ये ही घटना घडली. गाडी कसारा रेल्वे स्टेशनवर पोहोचल्यानंतर प्रवाशांनी मदत मागितली. आत्तापर्यत चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. या प्रकरणी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. इतर आरोपींचा शोध सुरू आहे."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

पुष्पक एक्स्प्रेस कसाऱ्याला पोहोचल्यावर प्रवाशांनी आरडाओरडा केला. दोन आरोपींना GRPने घटनास्थळीच अटक केली. आणखी 2 जणांना रात्री उशीरा अटक करण्यात आली तर पोलीस अजून 4 आरोपींचा शोध घेत आहेत.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)