अमरिंदर सिंग भाजपच्या वाटेवर? अमित शहांच्या भेटीला

फोटो स्रोत, @Capt.Amarinder

वाचन वेळ: 2 मिनिटे

पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आज दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यामुळे अमरिंदर सिंग भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे का, याबाबत चर्चेला सुरुवात झाली आहे.

18 सप्टेंबर रोजी कॅ. अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

त्यानंतर काँग्रेस नेते चरणजीत सिंह चन्नी यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री आहेत.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांना तडकाफडकी मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होतं. जवळपास दशकभर ते पंजाबचे मुख्यमंत्री होते. पण त्यांच्याबद्दल मोठी नाराजी निर्माण झाली होती. नवज्योत सिंह सिद्धू यांनी ही नाराजी बोलून दाखवली होती.

त्यानंतर अमरिंदर सिंग यांना राजीनामा द्यावा लागला.

अमरिंगर सिंग यापुढे काय राजकीय पाऊल उचलतात, याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे.

पुढच्या सहा महिन्यांत पंजाबात निवडणुका आहेत. नवे मुख्यमंत्री, आधीचेच मंत्री यांच्यासह काँग्रेसला पुन्हा सत्तेत येण्याचं आव्हान आहे.

त्यामुळे अमरिंदर सिंग यांची राजकीय भूमिका काँग्रेसच्या दृष्टीनेही महत्त्वाची असेल.

2014 मध्ये बडे-बडे काँग्रेस नेते लोकसभा निवडणूक लढवणं टाळत होते, त्यावेळी सोनिया गांधी यांच्या सांगण्यावरून कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी अरूण जेटली यांच्याविरुद्ध अमृतसर मतदारसंघात निवडणूक लढवली. या निवडणुकीतत्यांनी जेटली यांना पराभूतही केलं. त्यावेळी कॅप्टन अमरिंदर सिंग पंजाब विधानसभेत आमदार म्हणून कार्यरत होते.

फोटो स्रोत, Twitter

फोटो कॅप्शन, कॅप्टन अमरिंदर आणि नवज्योत सिंग सिद्ध यांच्यातला बेबनाव काँग्रेससाठी घातक ठरला.

2017 साली कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याच नेतृत्वाखाली काँग्रेसने विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत 117 जागांपैकी 77 जागांवर विजय मिळवून काँग्रेस 10 वर्षांनंतर सत्तेत परतली.

केंद्रात मोदी सरकार स्थापन झाल्यापासून एक-एक राज्य काँग्रेसच्या हातातून निसटत असताना अमरिंदर सिंग यांनी पंजाबात मिळवलेला विजय काँग्रेससाठी महत्त्वाचा होता.

फोटो स्रोत, Getty Images

या विजयामुळे भाजपची विजयी घोडदौड रोखण्याची कामगिरी सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने केली.

2019 मध्ये पुन्हा एकदा मोदी लाटेची चर्चा होती. पण पंजाबमध्ये त्याचा फारसा परिणाम जाणवला नाही. इथल्या 13 लोकसभा जागांपैकी एकूण 8 जागा मिळवण्यात काँग्रेसला यश आलं. या विजयामुळे कॅप्टन अमरिंदर सिंग यांची राजकीय उंची अधिकच वाढली.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)