You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आईने नाकारलेल्या, खेळण्यात आई शोधणाऱ्या व्हायरल 'बेबी पंच'ची गोष्ट- पाहा फोटोंमधून
आईने नाकारलेल्या एका खेळण्यात आपल्या आईला शोधणाऱ्या माकडाच्या पिलाचे व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. हा चिमुकला जीव अनेकांना भावूक करत आहे. हा पंच आणि त्याच्या खेळण्याची गोष्ट काय आहे?
जपानच्या इचिकावा सिटी झूमध्ये जुलै 2025 मध्ये पंचचा जन्म झाला. उष्णतेची लाट असल्यामुळे त्याच्या आईला प्रसूतीचा त्रास झाला होता. त्यामुळे तिने या आपल्या पिलाला स्वीकारलंच नाही.
जन्मतःच आईने टाकलेल्या या पिलाला झूमधल्या कर्मचाऱ्यांनी सांभाळलं, पण त्याला गरज त्याच्यासारख्याच कोणाच्या तरी प्रेमाची होती.
पण इतर माकडं त्याला सामावून घेत नव्हती, त्रास देत होती. आई नसल्यामुळे कळपात मिसळायला त्याला अडचणी येत होत्या.
त्याची भावनिक गरज भागवण्यासाठी झूच्या कर्मचाऱ्यांनी मग त्याला एक स्टफ्ड ओरांगउटानचं बाहुलं दिलं.
एकट्या पडलेल्या पंचने त्या खेळण्यातच माया शोधली...जिथे जाईल तिथे तो हे खेळणं घेऊन जायचा.
या खेळण्याच्या कुशीत शिरून झोपलेल्या पंचचे फोटो- व्हीडिओ पाहून अनेकांचे डोळे पाणावले.
पण आता पंचसाठी परिस्थिती बदलत असल्याचं झू च्या कर्मचाऱ्यांनी सांगितलं आहे. सात महिन्यांच्या पंचला इतर माकडं थोडं थोडं सामावून घेत आहेत.
इतर माकडांसोबत तो आता दिसतो.
दरम्यान, सोशल मीडियावर #hangintherepunch हा हॅशटॅगही ट्रेंड होऊ लागला होता.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)