You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
55 लाखांची स्कॉलरशिप मिळवणारा कोरकू समुदायातील पहिला तरूण, कसा आहे किशोर बेठेकरचा प्रवास?
महाराष्ट्राचं अगदी शेवटचं टोक असलेल्या मेळघाटातील अतिदुर्गम चिलाटी गावामधला तरूण किशोर बेठेकर. त्याला उच्च शिक्षणासाठी इंग्लंडच्या ब्रिस्टॉल विद्यापीठाची 55 लाखाची शिष्यवृत्ती मिळाली आहे. त्याने टाटा सामाजिक विज्ञान संस्थेमधून सोशल वर्क या विषयातील पदवी घेतली आहे.
आश्रम शाळेतून शिक्षण पूर्ण केलेल्या किशोरची घरची परिस्थिती गरिबीची. शेतातली कामं करून त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं.
गावात इंटरनेटची सुविधा नव्हती, मोबाईल नेटवर्कही कमी. घरात कोरकू भाषा, शाळेत मराठी आणि बाहेर हिंदी. या सगळ्या अडचणींवर मात करत त्याने शिक्षणाचा प्रवास सुरू ठेवला.
घरामध्ये कुणीच शिक्षित नसल्यामुळे 12वीनंतर काय असा प्रश्न होता. गावात मोजकेच लोक होते जे पदवीपर्यंत पोहचले होते. अशावेळी राजू केंद्रे यांनी किशोरला मार्गदर्शन केलं आणि त्याने BSW ला प्रवेश घेतला.
तिथून परदेशातील विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळवण्यापर्यंतचा त्याचा प्रवास कसा होता?
पाहा व्हीडिओ-
रिपोर्ट- नितेश राऊत
एडिटिंग- अरविंद पारेकर
निर्मिती- प्राजक्ता धुळप
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)