इजिप्त : ४४०० वर्षं जुन्या कबरीचं रहस्य उलगडणार

फोटो स्रोत, AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, नुकताच शोध लागलेल्या कबरीला भेट देण्याची संधी पत्रकारांना मिळाली.

इजिप्त प्रसिद्ध आहे ते पिरॅमिड आणि ममींसाठी. हजारो वर्षांपूर्वीच्या या संस्कृतीचं आजही इतिहासप्रेमी, संशोधक, पर्यटक यांना कुतुहल आहे. याच इजिप्तमध्ये शास्त्रज्ञांना ४४०० वर्षांपूर्वीची एक कबर सापडली आहे. एका पुजाऱ्याची ही कबर असल्याचं सांगितलं जात आहे. शास्त्रज्ञांमध्ये या कबरीच्या शोधामुळे उत्साहाचं वातावरण आहे.

इजिप्तच्या सांस्कृतिक मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी मुस्तफा वाझिरी यांनी या शोधाला, गेल्या अनेक दशकांतलं एक महत्त्वपूर्ण संशोधन असल्याचं म्हटलं आहे.

कैरोच्या जवळ असलेल्या सक्कारा प्रांताजवळ सापडलेल्या या कबरीत रंगवलेल्या चित्रलिपी आहेत. तसंच राजाचा पुतळाही आहे.

भिंतींवर त्या कबरीचे मालकांची प्रतिमा आहे. या प्रतिमांत ते त्यांची आई, पत्नी आणि इतर नातेवाईकांसोबत बसलेले दिसतात.

या कबरीच्या उत्खननाला सुरुवात झाली असून शास्त्रज्ञांना इथे अजूनही रहस्यमय गोष्टींचा उलगडा होईल, अशी आशा आहे.

या रहस्यमय कबरीची ही झलक

फोटो स्रोत, AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, इजिप्तमधले सर्वांत जुने आणि प्राचीन पिरॅमिड सक्कारामध्ये आढळतात. ही खासगी कबरही या परिसरात मिळाली.

फोटो स्रोत, AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, ही कबर एका तळ्याखाली दबली गेली होती.

फोटो स्रोत, AFP/Getty Images

फोटो कॅप्शन, या पिरामिडच्या भिंतीवर चित्रलिपी काढण्यात आली आहे. प्राचीन काळात इजिप्तमध्ये चित्रलिपी वापरली जायची.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, त्याकाळात इजिप्तमध्ये कबरींवर किंवा मंदिराच्या भिंतीवर मूर्ती कोरलेल्या असत.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, मुस्तफा आब्दो हे या कबरीचं संशोधनाचं करणाऱ्यांचे प्रमुख आहेत. ही कबर १० मीटर लांब, ३ मीटर रुंद आणि ३ मीटरपेक्षा कमी उंचीची आहे.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, त्या काळात देवाला खूश ठेवणं याला सर्वोच्च प्राधान्य होतं. त्यामुळे इजिप्तच्या इतिहासात पुजाऱ्यांना महत्त्वाचं स्थान आहे.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, या कबीरतले रंगं अजूनही सुरक्षित आहेत.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, इजिप्तमधील राजघराण्यांच्या माहितीवर या कबरीतून प्रकाश पडेल.

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, या शिल्पात पुजारी कुटुंबासोबत दिसतो.

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, हे संशोधन अजून सुरू आहे.

All pictures subject to copyright

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)