पूजा सिंघल यांना अटक

फोटो स्रोत, ANI
झारखंडच्या खाण सचिव पूजा सिंघल यांना ईडीने अटक केली आहे. प्रदीर्घ अशा चौकशीनंतर सिंघल यांना अटक करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी पूजा सिंघल आणि त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) छापे टाकले होते.
पूजा सिंघल यांच्या सीएच्या घरी 17 कोटी रुपये आढळले होते. पूजा सिंघल 2000 बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्या घरी, सासरी, त्यांच्या पतीच्या रुग्णालयात आणि अन्य संलग्न ठिकाणी ईडीने छापे टाकले होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
या छाप्यांमध्ये ईडीनं 19.31 कोटी रुपये रोख जप्त केले आहेत. शुक्रवारी सकाळी ईडीनं त्यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकले होते.
खुंटी जिल्ह्यात 2008 ते 2011 दरम्यान मनरेगामध्ये झालेल्या 18 कोटींच्या घोटाळ्यासंबंधित ही छापेमारी असल्याचं सांगितलं जात आहे.
त्यावेळी पूजा सिंघल या खुंटीच्या जिल्हाधिकारी होत्या. पूजा सिंघल या झारखंड केडरच्या ज्येष्ठ आयएएस अधिकारी असून सध्या झारखंडच्या खाण सचिव आहेत.

फोटो स्रोत, Ani
ईडीच्या टीमनं पूजा यांचं सरकारी निवासस्थान आणि पतीच्या मालकीच्या खासगी दवाखान्यात छापा टाकून तिथले कागदपत्रं तपासले आहेत.
याशिवाय पूजा यांच्याशी संबंधित काही जागांवर छापेमारी सुरू आहे.
छापेमारीत काय आढळलं?
रांचीमध्ये दोन ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये 19.31 कोटी रुपये रोख जप्त करण्यात आले आहेत.
त्यापैकी 17.51 कोटी रुपये पूजा सिंघल यांच्याशी संबंधित चार्टर्ड अकाऊटंट आणि आर्थिक सल्लागार सुमन कुमार यांच्या घरातून जप्त करण्यात आले आहेत. तर जवळपास 1.8 कोटी रोख रक्कम शहरातील दुसऱ्या एका ठिकाणाहून हस्तगत करण्यात आली आहे.
आज ईडीनं सुमन कुमार यांना अटक केली आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "राज्यातील कथित बेकायदेशीर खाणकामांशी राजकीय आणि उच्च नोकरशाहीचा संबंध दर्शविणारी अनेक कागदपत्रं जप्त करण्यात आली आहेत."
राजकीय आरोप प्रत्यारोप
झारखंडच्या गोड्डा येथील भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी ईडीच्या छापेमारीनंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर आरोप केला आहे.
ते म्हणाले की, मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारनं भ्रष्टाचाराच्या बाबतीत आधीच्या मधू कोडा सरकारला मागे टाकलं आहे.
कोडा यांना 2009 मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली होती
"यावरून राज्यातील भ्रष्टाचाराची पातळी दिसून येते. राज्यात पैसे आणि लाच घेतल्याशिवाय काहीही होत नाही," असं त्यांनी पीटीआयशी बोलताना म्हटलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 3
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनीही ईडीच्या छाप्यांवर भाष्य केलं आहे.
ते म्हणाले, "या केवळ धमक्या आहेत. भाजप मुख्य मुद्द्यांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करत आहे. पण, राज्य सरकार केंद्राकडून आवश्यक गोष्टी मागत राहील. भाजपनं राज्यातील सर्वांत मोठा पक्ष असल्याचा दर्जा गमावला आहे आणि त्यामुळे ते आक्षेप घेत आहेत."
"देशात नियम आणि कायदे आहेत. कोणीही त्यांचे उल्लंघन केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील," असंही सोरेन म्हणाले.
पूजा सिंघल कोण आहेत?
पूजा सिंघल या 2000 बॅचच्या झारखंड केडरच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी भारत सरकारमध्ये कृषी सचिवापासून ते पर्यटन आणि उद्योग सचिव पदावर काम केलं आहे.
वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवलं. त्यामुळे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही त्यांचं नाव नोंदवलं गेलं आहे.
पूजा सिंघल यांचं नाव अनेकदा वादात सापडलं आहे.

फोटो स्रोत, Ravi Prakash
झारखंडमध्ये जिल्हाधिकारी म्हणून काम करत असताना पूजा सिंघल यांनी मनरेगा योजनेंतर्गत 2 स्वयंसेवी संस्थांना 6 कोटी रुपये दिले होते. या प्रकरणी विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. पण नंतर त्यांना या प्रकरणात क्लिनचिटही मिळाली होती.
तर खुंटी जिल्ह्यात जिल्हाधिकारी असताना मनरेगा योजनेमध्ये 16 कोटींच्या घोटाळ्यात त्यांचं नाव आलं होतं. याच प्रकरणाची चौकशी सध्या ईडी करत आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)