पांडुरंग रायकर : पुण्यातल्या पत्रकाराचा मृत्यू कोरोनामुळे की सरकारच्या निष्काळजीपणामुळे?

फोटो स्रोत, facebook

वाचन वेळ: 3 मिनिटे

टीव्ही 9 मराठीचे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचे कोरोनामुळे निधन झाले. ते 42 वर्षांचे होते. कोरोनाच्या काळात त्यांनी फिल्डवरून अनेक बातम्या केल्या. त्यांच्या पाठीमागे आई, वडील, पत्नी, मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.

पांडुरंग रायकर हे गेली 15 वर्षं पत्रकारितेमध्ये होते. ईटीव्ही मराठी, एबीपी माझानंतर ते टीव्ही 9 मराठीला पुणे प्रतिनिधी म्हणून नियुक्त झाले.

कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांना 30 ऑगस्ट रोजी जम्बो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांच्या ऑक्सिजनची पातळी घटली. त्यानंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली सुरू झाल्या.

फोटो स्रोत, Alamy

पण त्यातवेळी पुण्यात व्हेंटिलेटर उपलब्ध होत नव्हते. मध्यरात्री पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात व्हेंटिलेटर असल्याची माहिती मिळाल्यानंतर, पांडुरंग यांना मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्याच्या हालचाली केल्या. मात्र जम्बो कोव्हिड सेंटरमधून मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अ‍ॅम्ब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता.

प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे माझा भाऊ गेला अशी प्रतिक्रिया पांड़ुरंग यांची बहिणीनं दिली आहे.

"एक कार्डिअॅक अॅम्ब्युलन्स उपलब्ध होऊ शकली नाही, किती हा निष्काळजीपणा आहे, दुसऱ्या दिवशी खूप भूक लागली म्हणून दादाने मला फोन केला. मला घरचा डबा घेऊन ये असं तो बोलला. म्हणून मी 8 वाजता त्याला डब्बा पाठवला. बाहेरच्या लोकांच्या हातात डब्बा दिला. पण तो शेवटपर्यंत त्याच्यापर्यंत पोहोचलाच नाही. औषधंसुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचली नाहीत," असं पांडुरंग यांच्या बहिणीनं टीव्ही-9 मराठीशी बोलताना म्हटलंय.

या घटनेची दखल पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी घेतली आहे. व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न करण्यात यावा असं मोहोळ यांनी म्हटलं आहे.

"व्यवस्थेतील ज्या काही त्रुटी दोष असतील, कोणतीही यंत्रणा असेल, महापालिका रुग्णालय किंवा राज्य शासनाने उभारलेले जम्बो हॉस्पिटल असेल ही जबाबदारी कोणी कोणावर न ढकलता ही स्वीकारली पाहिजे," असं महापौर मोहोळ यांनी म्हटलं.

दिग्गजांकडून श्रद्धांजली

गृहमंत्री अनिल देशमुख यांचं ट्वीट

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

"पत्रकाराला जीव गमवावा लागला. राज्याचा कारभार विस्कळीत आहे. मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत," अशी प्रतिक्रिया विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

सुप्रिया सुळे

X पोस्टवरून पुढे जा, 3
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 3

अमोल कोल्हे

X पोस्टवरून पुढे जा, 4
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 4

कोण होते पांडुरंग रायकर?

मूळचे अहमदनगरचे असलेले पांडुरंग गेल्या 15 वर्षांपासून जास्तकाळ पत्रकारीतेत आहेत. ईटीव्हीमधून त्यांनी त्यांच्या टीव्ही पत्रकारीतेची सुरुवात केली होती. त्यानंतर पुढारी, एबीपी माझा आणि टीव्ही-9 मराठी अशा माध्यमांसाठी त्यांनी काम केलं.

शेती ते सिनेमा, क्रीडा ते राजकारण अशा विविध विषयांवर पांडुरंग यांनी वार्तांकन केलं. गेल्या तीन वर्षापासून ते टीव्ही 9 मराठीसोबत होते.

पुणे महानगरपालिकेचं स्पष्टीकरण

पुणे महापालिलेनं एक पत्रक प्रसिद्ध करून पांडूरंग रायकर यांच्या मृत्यची चौकशी करणार असल्याचं म्हटलंय. तसंच नेमकं काय घडलं याचं स्पष्टीकरण दिलं आहे.

त्या पत्रकानुसार,

'पांडुरंग रायकर यांना 20 ऑगस्टला ताप सर्दी झाल्याने त्यांनी स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार घेतले. पण नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार त्यांची 27 ऑगस्टला त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यानंतर ते त्यांच्या मुळगावी कोपरगाव गेले. तिथं त्यांनी 31 ऑगस्टला अॅंटजनी टेस्ट केली ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांना कोपरगावच्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांची प्रकृती खालवल्याने त्यांना त्याच दिवशी पुण्यातील सीओईपी मैदानावरील जम्बो कोव्हिड रुग्णालयात रात्री 8.30 वाजता दाखल करण्यात आलं

त्यांच्या सर्व चाचण्या करुन त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं. संध्याकाळपर्यंत ते स्टेबल झाले होते. ते 15 लिटर ऑक्सिजन मेंटेन करू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना 1 सप्टेंबर रोजी आयसीयूमध्ये हलविण्यात आलं. तसंच योग्य ते उपचार देण्यास सुरुवात करण्यात आली.

रायकर यांच्या नातेवाईकांनी त्यांना दीनानाथ मंगेशकर या खासगी रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्यांची वैद्यकीय परिस्थिती पाहता त्यांना कार्डिअॅक रुग्णवाहिकेतून दुसऱ्या रुग्णालयात हलविणे गरजेचे असल्याने ती रुग्णवाहिका मिळविण्याचे प्रयत्न नातेवाईकांकडून सुरु होते. तोपर्यंत त्यांच्यावर कोव्हिड-19 मार्गदर्शक तत्वानुसार सर्व प्रकारच्या उपचार पद्धतीचा अवलंब केला गेला. पण कार्डिओरेस्पिरेटरी फेल्युअरमुळे त्यांच्या मृत्यू झाला,' अस पुणे महापालिकेचं म्हणणं आहे.

रायकर यांना दिलेल्या उपचार पद्धतीची चौकशी करण्याचे आदेश ससून रुग्णालयाच्या अधिष्ठातांना देण्यात आल्याचं पुण्याचे आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी सांगितलं आहे.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)