बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिकांनी पुन्हा आंदोलन का केलं?
रत्नागिरीतल्या बारसू रिफायनरी प्रकल्पाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी आज आंदोलन केलं.
रिफायनरी प्रकल्पासाठी जमिनीच्या सर्वेक्षणाला आंदोलनकर्त्यांनी विरोध केला. आंदोलकांमध्ये महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणात होता.
यातल्या काही महिलांनी घटनास्थळी झोपून आंदोलन केलं. यापैकी 25 महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मात्र, पोलीस घटनास्थळी दमदाटी करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. याबद्दल पोलिसांची बाजू अजून आलेली नाही.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हे सर्वेक्षण थांबवण्याची मागणी केली. तर, विरोधकच यात राजकारण करत असल्याचा आरोप उद्योमंत्र्यांनी केला.
हेही वाचलंत का?
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



