कोस्टल रोडसाठी कांदळवन तोडण्याला विरोध का? मच्छिमार काय म्हणतात?
मुंबई महापालिकेच्या कोस्टल रोड फेज 2 प्रकल्पासाठी वर्सोवा ते भाईंदरपर्यंत कांदळवनातील तब्बल 45 हजार वृक्ष तोडले जाणार आहेत. त्याचा परिणाम या परिसरातल्या कांदळवन आणि मासेमारीवर होणार आहे. त्यामुळेच मुंबईकर, पर्यावरणप्रेमी या विरोधात आवाज उठवताना दिसत आहेत.
या प्रकल्पामुळे मच्छिमारांसमोर उपजीविकेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. चारकोप गावात राहणारे 52 वर्षीय मच्छीमार संजय भंडारी चिंतेत आहेत. कारण ते जिथे प्रकल्प होत आहे त्या खाडी परिसरात जाऊन ते मासेमारी करतात. त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो.
चारकोप ते बंदर पखाडी इथल्या कोळीवाड्यातील इतर मच्छिमारही या प्रक्लपावर चिंता व्यक्त करत आहेत.
फक्त मासेमारीलाच अडचणी येतील असं नाही, तर या परिसरातील जैव विविधता संकटात सापडेल, अशीही भीती व्यक्त केली जात आहे.
या प्रकल्पामुळे होणाऱ्या पर्यावरणीय हानी संदर्भात पर्यावरण संघटना वनशक्तीने मुंबई हायकोर्ट आणि सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र उच्च न्यायालयाने काही अटींसह प्रकल्पाला संमती दिली, सुप्रीम कोर्टानेही तोच निर्णय कायम ठेवला. मात्र पर्यावरणप्रेमी त्यांच्या लढ्यावर ठाम आहेत.
- रिपोर्ट- अल्पेश करकरे
- शूट- शार्दूल कदम
- एडिट- अरविंद पारेकर
- निर्मिती- अमृता कदम
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






