You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारताकडून पाकिस्तानचा पुन्हा वर्ल्ड कपमध्ये पराभव; इस्लामाबादमधील क्रिकेट चाहते काय म्हणाले?
भारताकडून पाकिस्तानचा पुन्हा वर्ल्ड कपमध्ये पराभव; इस्लामाबादमधील क्रिकेट चाहते काय म्हणाले?
पुरुषांच्या ट्वेन्टी20 विश्वचषकाच्या साखळी फेरीत भारतानं पाकिस्तानचा 61 धावांनी पराभव केला. कोलंबोमध्ये झालेल्या सामन्यात भारतानं प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानसमोर विजयासाठी 176 धावांचं आव्हान ठेवलं. पण पाकिस्तानचा संपूर्ण संघ 114 धावांवर गारद झाला.
प्रथम फलंदाजी करताना भारताकडून ईशान किशननं जबाबदारी उचलली आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली. त्यानं 77 धावा केल्या. ईशान सामनावीरही ठरला.
भारताकडून पाकिस्तानचा पुन्हा वर्ल्ड कप मध्ये पराभव झाल्यानंतर पाकिस्तानचे इस्लामाबादमधले चाहते दुःखी होऊन काय म्हणाले? पाहा इस्लामाबादेतून शुमाईला जाफरी यांचा रिपोर्ट
- शूट-एडिट - फाखिर मुनीर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)