पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप नेत्यांनी त्यांच्याच सरकारविरोधात दिल्या घोषणा; नेमकं काय घडलं?
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजप नेत्यांनी त्यांच्याच सरकारविरोधात दिल्या घोषणा; नेमकं काय घडलं?
संसदेत महिला आरक्षण विधेयकासह Delimitation शी निगडित विधेयकं नामंजूर झाल्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षाचा निषेध करायला भाजपच्या पिंपरी चिंचवडमधल्या नेत्यांनी घोषणा दिल्या.
यावेळी भाजपच्या आमदार उमा खापरे आणि काही नगरसेवकही उपस्थित होते. याशिवाय शिंदे शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवकही हजर होते.
महापालिकेत एका मीटिंगनंतर भाजप नेते प्रशांत शितोळे यांनी घोषणा द्यायला सुरुवात केली.
पाहा काय घडलं
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)