तामिळनाडू निवडणुकीनंतर द्रविड पक्षांचीच सत्ता टिकेल की नवीन समीकरणं दिसतील?

व्हीडिओ कॅप्शन, तामिळनाडू निवडणूक : द्रविड पक्षांचीच सत्ता टिकेल की नवीन समीकरणं दिसतील?
तामिळनाडू निवडणुकीनंतर द्रविड पक्षांचीच सत्ता टिकेल की नवीन समीकरणं दिसतील?

तामिळनाडूमध्ये गेली अनेक वर्षं द्रविड पक्षांची सत्ता आहे. जयललिता आणि करुणानिधी या 2 दिग्गज राजकारण्यांच्या निधनानंतर राज्यातली ही दुसरी निवडणूक.

गेली अनेक दशकं याच 2 नेत्यांकडे राज्याची मुख्यमंत्रिपदाची सूत्रं होती. आता 2026 मध्ये या राज्याचं राजकारण द्रमुक आणि अण्णाद्रमुकभोवतीच फिरतंय का? भाजप आणि काँग्रेससारख्या राष्ट्रीय पक्षांची इथे काय स्थिती आहे?

लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू

एडिटिंग - अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)