गोष्ट दुनियेची, पुतळे अर्थात Statuesना आपण इतकं महत्त्व का देतो? BBC News Marathi गोष्ट दुनियेची

2020 मध्ये अमेरिकेच्या मिनियापोलीसमध्ये जॉर्ज फ्लाईड नावाच्या एका कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मानेवर एका पोलिसाने गुडगा ठेवल्यामुळे त्याचा मृत्यू झाला होता. त्या मृत्यूचा राग जगभरात पाहायला मिळाला होता, पण काही ठिकाणी त्याचा राग जुन्या पुतळ्यांवर काढण्यात आला. पुतळ्यांवर का? या निर्जीव, मुक्या पुतळ्यांमध्ये असं काय असतं की लोक ते उभारण्याची मागणी करतात किंवा रोष आणि संताप व्यक्त करताना ते पाडूनही टाकतात. आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत की आपण पुतळ्यांना एवढं महत्त्व का देतो? मूळ निर्मिती - द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती आणि आवाज - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - तिलक राज भाटिया