You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गोष्ट दुनियेची, व्हीडिओ गेम्स आपण का खेळतो? BBC News Marathi गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
सुमारे चार दशकांपूर्वी गाजलेला मारियो गेम तुम्ही एकदा तरी पाहिला आणि कदाचित खेळलाही असेल. तेव्हापासून आजवर व्हीडिओ गेम्सचं जग प्रचंड मोठं झालंय. रोडरॅश, अलादिन, नीड फॉर स्पीडसारखे कंप्युटर गेम्स असो वा अँग्री बर्ड्स, कँडी क्रश किंवा पब्जी-कॉल ऑफ ड्युटीसारखे मोबाईल गेम्स, आपापल्या काळात यापैकी प्रत्येकच गेमने आपल्याला वेड लावलंय. इतकं की काही मुलांनी या गेम्सच्या नादात टोकाचं पाऊलही उचललंय. आईने फोन दिला नाही म्हणून कुणी स्वतःचं आयुष्य संपवलंय, तर कुणाला GTAचा गेम खेळूनखेळून प्रत्यक्षात गुन्हेगारी क्षेत्रात उतरायची प्रेरणा मिळालीय. आज गोष्ट दुनियेची ऐकताना आपण अशाच काही व्हीडिओ गेम्सबद्दल बोलणारोत, आणि उत्तर शोधणारोत एका प्रश्नाचं - की खरंच व्हीडिओ गेम्स नुसते टाईमपाससाठी असतात की त्यातून काही चांगल्या गोष्टीसुद्धा साध्य होऊ शकतात? मूळ संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – तिलक राज भाटिया