गोष्ट दुनियेची, भाग 29 - सेंद्रिय शेतीच्या स्वप्नाने श्रीलंकेचं वाटोळं केलं का?

श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष गोटाभया राजपक्षे यांनी एप्रिल 2021 मध्ये घोषणा केली की देशातली संपूर्ण शेती सेंद्रीय किंवा ऑरगॅनिक पद्धतीने केली जाईल. ही योजना जितकी महत्त्वाकांक्षी होती, तितकीच ती अनियोजितसुद्धा होती. त्यामुळेच आज श्रीलंका ज्या आर्थिक गर्तेत सापडलाय, त्यासाठी या निर्णयालासुद्धा जबाबदार ठरवलं जातं. आपण गोष्ट दुनियेची ऐकताना हेच जाणून घेणार आहोत, की खरच सेंद्रिय शेतीमुळे श्रीलंकेचं वाटोळं झालं का? मूळ निर्मिती: द इन्कावयरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती, लेखन आणि आवाज: गुलशनकुमार वनकर एडिटिंग: तिलक राज भाटिया