You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गोष्ट दुनियेची, भाग 13: 5G मुळे कोरोना पसरतो, अशा अफवा कुठून येतात? कशा पसरतात? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट
काही दिवसांपूर्वी अमेरिकेत AT&T आणि Verizon सारख्या टेलेकॉम कंपन्या 5G सेवा सुरू करणार होत्या. पण हे नवीन 5G सिग्नल, जे आपला मोबाईल आणि इंटरनेट वापर आणखी वेगवान करू शकतात, ते काही विमानांमध्ये तांत्रिक बिघाड आणू शकतात, असं सांगत एअरबस आणि बोइंग या विमान निर्मात्यांनी 5g सेवा सध्या सुरू करू नका, अशी मागणी केली. 5G बद्दल आपण गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ऐकतोय, पण अजूनही जगभरात त्याविषयी सांशकताच आहे. 2020च्या सुरुवातीला जेव्हा जगभरात कोरोनाचा उद्रेक होत होता, तेव्हा अनेक देशांमध्ये 5G मोबाइल टॉवर्सवर हल्ल्यांच्या बातम्या येत होत्या. एकट्या ब्रिटनमध्ये दोन महिन्यांत 77 मोबाइल टॉवर्स पेटवून देण्यात आले. अशाच घटना नेदरलँड्स, इटली, बेल्जियम, साइप्रस, फ्रांससह जवळजवळ पूर्ण युरोपात घडताना दिसत होत्या. कारण काय? तर एक अफवा की 5G तंत्रज्ञानामुळे कोरोना व्हायरस वेगाने पसरू शकतो. तेव्हा असा दावा करणारे अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर फिरत होते. तुम्हाला आठवत असेल, काही महिन्यांपूर्वी भारतातही अभिनेत्री जुही चावलाने कोर्टात एक याचिका दाखल करत 5G नेटवर्कला विरोध केला होता. तर या आठवड्यात गोष्ट दुनियेची ऐकताना आपण जाणून घेणार आहोत, की खरंच लोक 5G मोबाइल technologyला एवढे का घाबरतायत? इतके तथ्य आणि पुरावे असतानाही लोक अशा अफवांना बळी का पडतात? संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा एडिटर – तिलक राज भाटिया