गोष्ट दुनियेची, भाग 12: अंतराळातला कचरा आपण कसा साफ करणार? गोष्ट दुनियेची पॉडकास्ट

अंतराळात वेगवेगळ्या स्पेस मिशनचे कित्येक लहानमोठे तुकडे तरंगत आहेत, ज्यांपासून इतर मोहिमांना धोका कायम आहे. अंतराळातल्या कचऱ्याचा हा प्रश्न मोठा आहे, कारण यामुळे हे स्पेस मिशन्स संकटात सापडू शकतात. पण या कचऱ्याची विल्हेवाट आपण लावू शकतो का, जेणेकरून भविष्यात असे धोके टाळता येतील? या प्रश्नांची उत्तरं आज आपण गोष्ट दुनियेची ऐकताना मिळवणार आहोत. संशोधन – द इन्क्वायरी, बीबीसी न्यूज मराठी निर्मिती – गुलशनकुमार वनकर सहनिर्माते – मानसी दाश, मोहनलाल शर्मा एडिटर – तिलक राज भाटिया