कोरोना व्हायरसच्या उच्चाटनासाठी चीनकडून दडपशाही?

कोरोना व्हायरसच्या प्रसाराची सुरुवात चीनमधून झाली. आता चीनमधे याच्या संसर्गाचा वेग मंदावलाय. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी चीन सरकारच्या प्रयत्नांचं जागतिक आरोग्य संघटनेनेही कौतुक केलंय. पण खुद्द चीनच्या अंतर्गत भागात वेगळीच परिस्थिती आहे. तिथले लोक चीनने राबवलेल्या उपायांवर नाराज आहेत.

आत्ता दोन दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, कोरोनाचा प्रादुर्भाव हाताळण्याबद्दल राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यावर टीका करणारा एक उद्योगपती आता बेपत्ता असल्याचं त्याचे आप्त सांगतायत. सरकारवर टीका करणाऱ्यांचा आवाज दाबला जात असल्याचे आरोप होत आहेत.

बीबीसीचे चीनमधले प्रतिनिधी जॉन सडवर्थ यांचा हा रिपोर्ट.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)