इंदिरा गांधी यांचे हे दुर्मीळ फोटो तुम्ही पाहिलेत का?

वाचन वेळ: 2 मिनिटे

इंदिरा गांधी यांचा प्रवास फोटोंच्या माध्यमातून जाणून घेऊया.

19 नोव्हेंबर 1917ला अलाहाबाद इथं आनंद भवनमध्ये पंडित जवाहरलाल आणि कमला नेहरू यांच्या मुलीचा जन्म झाला.

फोटो स्रोत, INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE

फोटो कॅप्शन, 19 नोव्हेंबर 1917 ला अलाहाबाद इथं आनंद भवनमध्ये मुलीचा जन्म झाला. त्या मुलीचं नाव ठेवण्यात आलं इंदिरा प्रियदर्शिनी.

फोटो स्रोत, INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE

फोटो कॅप्शन, मुलीचा जन्म झाल्यानं नेहरू कुटुंबातील काही सदस्य नाराज होते. पण जवाहरलाल नेहरू अतिशय आनंदात होते.

फोटो स्रोत, INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE

फोटो कॅप्शन, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्यासोबत इंदिरा.

फोटो स्रोत, INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE

फोटो कॅप्शन, इंदिरा यांचा फिरोज गांधी यांच्याशी 26 मार्च 1942 ला अलाहाबादमध्ये विवाह झाला.

फोटो स्रोत, INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE

फोटो कॅप्शन, लग्नानंतर दोघेही काश्मीरला फिरायला गेले. काश्मीर हे नेहरू- गांधी कुटुंबाचं आवडतं ठिकाण.

फोटो स्रोत, INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE

फोटो कॅप्शन, इंदिरा गांधी 1959-60 मध्ये काँग्रेसच्या अध्यक्ष झाल्या.

फोटो स्रोत, INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE

फोटो कॅप्शन, तत्कालीन राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांनी 18 मार्च 1971 ला इंदिरा गांधींना पंतप्रधानपदाची शपथ दिली. त्या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या.

फोटो स्रोत, INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE

फोटो कॅप्शन, फॅमिली फोटो : संजय, राजीव, मेनका, सोनिया, प्रियांका आणि राहुल गांधी यांच्यासह इंदिरा.

फोटो स्रोत, INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE

फोटो कॅप्शन, राहुल आणि प्रियांका गांधी यांच्यासह आजीच्या भूमिकेत इंदिरा गांधी.

फोटो स्रोत, INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE

फोटो कॅप्शन, जानेवारी 1969 - लंडनमध्ये महाराणी एलिझाबेथ यांच्यासमवेत.

फोटो स्रोत, INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE

फोटो कॅप्शन, जुलै 1972 मध्ये पाकिस्तानचे राष्ट्रपती ज़ुल्फिकार-अली-भुट्टो यांच्याबरोबर सिमल्यामध्ये. इथेच त्या महत्त्वाच्या सिमला करारावर दोन्ही देशांच्या प्रमुखांनी स्वाक्षऱ्या केल्या.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एका प्रसन्न क्षणी... उत्तर भारतातील तीज सण सामान्य महिलांसमवेत साजरा करताना इंदिरा गांधी.

फोटो स्रोत, INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE

फोटो कॅप्शन, हीच ती जागा! कार्यालयातून 1, सफदरजंग रोड या निवासस्थानाकडे निघालेल्या इंदिरा गांधी. 31 ऑक्टोबर 1984ला दोन अंगरक्षकांनी इथेच त्यांची हत्या केली.

फोटो स्रोत, INDIRA GANDHI MEMORIAL TRUST, ARCHIVE

फोटो कॅप्शन, तीन मूर्ती भवनमध्ये इंदिरा गांधी यांचा मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आला होता.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, तीन नोव्हेंबर 1984 ला इंदिरा गांधींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

याशिवाय, हेही वाचा -

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)