You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
लोकसभेत एपस्टिन फाईल्सचा उल्लेख करत राहुल गांधी काय म्हणाले?
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसदेत बजेटवरील चर्चेत भाग घेताना एपस्टिन फाईल्स, अनिल अंबानी, अदानी, भारत-अमेरिका व्यापार करार यांसारखे अनेक मुद्दे उपस्थित केले.
राहुल गांधी यांनी अनिल अंबानी आणि केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांच्यावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, "अनिल अंबानी हे एक उद्योगपती आहेत. ते अजून जेलमध्ये का नाहीत? कारण त्यांचे नाव एपस्टिन फायलींमध्ये आहे. हरदीप पुरी यांनी त्यांची ओळख करून दिली होती, हे देखील मला माहीत आहे. त्यांना स्वतःलाही माहीत आहे की, ही ओळख कोणी करून दिली."
राहुल गांधी यांनी असेही म्हटले की, "आपल्या संरक्षण बजेटमध्ये अदानींचा दबाव स्पष्टपणे दिसतो."
यावर पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी हरकती घेत म्हणाले की, सदनात नसलेल्या व्यक्तींची नावे घेणे योग्य नाही.
या वक्तव्यांवर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी प्रतिक्रिया देत राहुल गांधींवर 'बिनबुडाचे आरोप' केल्याचा आरोप केला आणि चुकीची विधानं कार्यवाहीतून वगळली जातील असे सांगितले.
दरम्यान, हरदीप पुरी यांनी पत्रकार परिषद घेत सांगितले की, एपस्टिनशी त्यांचे फक्त काही औपचारिक बैठकींपुरते संबंध होते. संयुक्त राष्ट्रातील त्यांच्या कार्यकाळानंतर इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूटमध्ये काम करताना एपस्टिनची ओळख झाली होती. "एपस्टिनशी संबंधित प्रकरणांशी माझा काहीही संबंध नाही," असे ते म्हणाले.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)