You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नागपूरमध्ये स्फोटकांच्या कंपनीतील स्फोटात 17 जणांचा मृत्यू, 18 जखमी; नेमकं काय घडलं?
नागपूरमध्ये स्फोटकांच्या कंपनीतील स्फोटात 17 जणांचा मृत्यू, 18 जखमी; नेमकं काय घडलं?
नागपूर जिल्ह्यातील राऊळगाव इथल्या 'एसबीएल एक्स्प्लोझिव्ह' या स्फोटकं तयार करणाऱ्या कंपनीत आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास स्फोट झाला आहे.
या स्फोटामध्ये 17 कामगारांचा मृत्यू झाला असून 18 जण जखमी झालेले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
स्फोटबद्दल कंपनीनं प्रतिक्रिया दिली असून ही घटना प्रकल्पाच्या पॅकिंग विभागात घडली असल्याचं सांगितलं आहे.
जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च कंपनी करणार असून इतर लोकांना आवश्यक ती आर्थिक मदत पुरवणे आमची जबाबदारी आहे, असंही कंपनीनं म्हटलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)