You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जातीमुळे छळ केल्याचा आरोप, पोलीस निरिक्षकाच्या पत्राने खळबळ; वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश तडवी यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करणारं पत्र लिहिल्याने खळबळ उडाली आहे. जातिवाचक वक्तव्ये, बदली आणि मानसिक त्रासामुळे आपण टोकाचा निर्णय घेत असल्याचा उल्लेख त्यांनी पत्रात केला आहे.
रमेश तडवी यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे की, महाड येथे प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना काही वरिष्ठ अधिकारी शंकर काळे यांनी वारंवार जातिवाचक बोलून अपमान करण्यात आला.
आपण आदिवासी भिल्ल समाजातून असल्यामुळे मुद्दाम त्रास दिला गेला. असा आरोप तडवी यांनी केला आहे. याबाबत आम्ही उप विभागीय पोलीस अधिकारी श्री. शंकर काळे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यास संपर्क केला पण त्यांनी प्रतिक्रिया द्यायला नकार दिला आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरुमचे प्रकाशन.