You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करण्याबाबत सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांना उत्तरे देताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अजित पवार यांच्या अपघाताबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर भाष्य केलं आहे.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाचे आमदार रोहित पवार यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.
त्या पार्श्वभूमीवर उत्तर देताना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, "याबाबत मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलेलं आहे आणि आम्हीही त्यांना चौकशी करण्यासाठीचं पत्र दिलेलं आहे. त्यामुळे चौकशीअंती आपल्याला या अपघाताबाबत कळलेच."
दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "यातील प्रत्येक गोष्ट ही सगळ्यांना समजलीच पाहिजे, असा आमचाही आग्रह आहे. त्यामुळे आम्हीही त्याचा पाठपुरावा करत राहू."