'मुंबई विद्यापीठाने माझा जिवंत रोहित वेमुला केला आहे', भंते विमांसा आंदोलन का करत आहेत?
'मुंबई विद्यापीठाने माझा जिवंत रोहित वेमुला केला आहे', भंते विमांसा आंदोलन का करत आहेत?
"मी सत्याग्रह करत असताना जातीय द्वेषभावनेतून, अल्पसंख्याकांविषयीच्या तिरस्कारातून आणि मानवी हक्कांचे उल्लंघन करून क्रूर छळ करणाऱ्या मुंबई विद्यापीठ प्रशासनाने माझा एक जिवंत रोहित वेमुला केला आहे."
हे शब्द आहेत, मुंबई विद्यापीठातले माजी संशोधक विद्यार्थी राजेश बळखंडे उर्फ भंते विमांसा यांचे..
223 दिवसांपासून विविध मागण्यांसाठी कलिना संकुलात सत्याग्रह आंदोलन करणाऱ्या विमांसा यांच्यावर गुन्हा दाखल करत त्यांना विद्यापीठातून प्रवेश रद्द करण्यात आला आहे. असं असला तरी त्यांनी न्याय मिळेपर्यंत सत्याग्रह सुरू ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)