दहशत, भीती आणि धावाधाव : लास वेगासमधली काळरात्र

लास वेगासच्या सनसेट स्ट्रीप भागातील मंडाले बे हॉटेल परिसरात हा गोळीबार झाला आहे. स्टीफन पॅडक नावाच्या 64 वर्षीय इसमानं हा हल्ला केला आहे.

फोटो स्रोत, Getty Images/David Becker

फोटो कॅप्शन, लास वेगासमध्ये एका काँसर्टदरम्यान झालेल्या गोळीबारात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. गोळीबार सुरू असताना भेदरलेल्या नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली.

फोटो स्रोत, Getty Images/David Becker

फोटो कॅप्शन, या घटनेतील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जातांना नागरिक.

फोटो स्रोत, Getty Images/David Becker

फोटो कॅप्शन, हल्ल्यानंतर तिथं कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. घटनास्थळाला पोलिसांनी चारही बाजूंनी वेढा घातला होता.

फोटो स्रोत, Getty Images/David Becker

फोटो कॅप्शन, हल्ल्यानंतर नागरिकांनी पुढाकार घेऊन एकमेकांना मदत केली.

फोटो स्रोत, Getty Images/David Becker

फोटो कॅप्शन, या काँसर्टसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. गोळीबारानंतर मोठी धावपळ उडाली.