पृथ्वीचा चंद्र कसा आहे? त्याची निर्मिती कशी झाली? वाचा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चंद्र आणि पृथ्वी
    • Author, अमृता दुर्वे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
  • वाचन वेळ: 4 मिनिटे

चंद्र! पृथ्वीचा एकुलता एक नैसर्गिक उपग्रह. अपोलो मोहिमा चंद्रावर उतरल्या - आर्टेमिसने चंद्राला फेरी मारली. पण मुळात हा चंद्र आहे कसा? कधीपासून आहे पृथ्वीसोबत? जाणून घेऊया.

चंद्राची निर्मिती साधारण 4.5 अब्ज वर्षांपूर्वी ज्यावेळी सौरमाला तयार होत होती त्यावेळी मंगळ ग्रहाच्या आकाराइतक्या एक वा अनेक खगोलीय वस्तू - space objects पृथ्वीवर आदळल्या. मंगळाच्या आकाराच्या या ग्रहाला Theia असंही म्हटलं जातं.

पृथ्वीच्या निर्मितीवेळी झालेल्या आघातानंतर पृथ्वीपासून काही वितळलेले घटक आणि इतर गोष्टी अवकाशात फेकल्या गेल्या आणि चंद्राची निर्मिती झाली. या मोठ्या आघातामुळेच चंद्राची निर्मिती झाल्याचं अपोलो मोहिमांनी चंद्रावरून आणलेल्या खडकांच्या अभ्यासातूनही सिद्ध झालंय.

सौरमालेची निर्मिती व्हायला सुरुवात झाल्याच्या साधारण 6 कोटी वर्षांनंतर चंद्राची निर्मिती झाल्याचं, चंद्र आणि पृथ्वीवरच्या दगडांमध्ये रासायनिक साधर्म्य असल्याचंही या दगडांवरून आढळलं.

Sorry, we can’t display this part of the story on this lightweight mobile page.

पृथ्वीच्या या उपग्रहाला आपण - चंद्र - Moon म्हणतो. पण इतरही ग्रहांना असे उपग्रह वा चंद्र आहेत हे दीर्घकाळ लोकांना माहितीच नव्हतं. सन 1610 मध्ये गॅलिलिओ गॅलिलींनी गुरूचे 4 चंद्र शोधल्यावर हे लक्षात आलं. लॅटिनमध्ये या चंद्राला म्हटलं जातं Luna - म्हणूनच चंद्राशी संबंधित गोष्टींसाठी Lunar हा शब्द वापरला जातो.

चंद्राचा आकार आहे पृथ्वीच्या 25% हून साधारण थोडा मोठा आहे. त्याचा व्यास 1,740 किमीचा असून तो पृथ्वीपासून 384,400 किमी अंतरावर आहे. आणि आपला हा चंद्र दरवर्षी पृथ्वीपासून साधारण इंचभर दूर जातोय.

पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला चंद्राला 27.3217 दिवस लागतात. म्हणजे साधारणपण 27 दिवस 7 तास 43 मिनिटं. पृथ्वीच्या तुलनेत चंद्रावरचं गुरुत्वाकर्षण 1/6 आहे. याचा परिणाम एकीकडे पृथ्वीवरच्या भरती - ओहोटीवर होत असतो. तर दुसरीकडे आपल्याला मूनवॉक करणारे अंतराळवीर टुणटुण उड्या मारत चालताना दिसतात.

चंद्रावरील तापमानाचा विचार करायचा झाल्यास पूर्ण सूर्य दिसत असेल तर 127 डिग्री सेल्शियस आणि अंधाऱ्या भागांमध्ये ते -173 डिग्री सेल्शियस इतकं खाली जाऊ शकतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, चंद्र

आपला चंद्र आहे तरी कसा? तर, आपल्या पृथ्वीसारखेच चंद्राचेही तीन मुख्य थर आहेत. कवच (Crust), आवरण (Mantle) आणि गाभा (Core). अब्जावधी वर्षांपूर्वी चंद्र वितळलेल्या स्थितीत होता. तो घन होत असताना लोहासारखी जड खनिजं विवरांमधून आत गेली तर वजनला हलक्या गोष्टी, कमी घनतेचे दगड पृष्ठभागावर राहिले. म्हणूनच चंद्राचा गाभा घन आहे, आवरण बहुतांश घन स्थितीत पण काही प्रमाणात द्रव स्थिती आहे आणि बाह्य कवच पातळ - असमान आहे.

गंमत म्हणजे आपल्याला चंद्राची जी बाजू दिसते तिथलं कवच मागच्या बाजूपेक्षा अधिक पातळ आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर Moon dust आहे. याला म्हणतात Lunar Regolith.

चंद्रावर उतरलेल्या अंतराळवीरांना चंद्रावरच्या या धुळीचा त्रास झाला होता. चंद्राच्या पृष्ठभागावरच्या रोव्हर्सनाही याच धुळीमुळे अडचणी येतात.

पाणी वा हवा नसल्याने या कणांची झीज होत नाही - परिणामी ते अतिशय तीक्ष्ण असतात. आणि ते स्थिर विद्युत भारित असल्याने सगळ्या गोष्टींनी चिकटतात - आणि त्यांना गनपावडरसारखा वास येतो.

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

चंद्रावर वातावरण आहे, पण ते अगदी विरळ आहे. पृथ्वीसारखं दाट नाही. याला lunar exosphere म्हटलं जातं. आणि यात प्रामुख्याने हेलियम, निऑन आणि अरगॉन हे वायू आहे. अगदी तुरळक प्रमाणात हायड्रोजनचे रेणू आढळतात. चंद्रावर सोडियम दुर्मिळ आहे. चंद्रावर आता ज्वालामुखी नसले तरी एकेकाळी इथे ज्वालामुखीचे उद्रेक होऊन गेल्याच्या खुणा सगळीकडे आहेत.

तुम्हाला माहित्येय चंद्र कधीही पाहिला - कधीही पृथ्वीवरून त्याचा फोटो काढला - तरी तो एकसारखाच दिसतो. कारण चंद्राची एकच बाजू आपल्याला कायम दिसते. दुसरी बाजू दिसतच नाही. कारण चंद्राला पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालायला जितका वेळ लागतो, तितकाच वेळ स्वतःच्या अक्षाभोवती फिरायला लागतो. आपल्याला चंद्राच्या पृष्ठभागाचा एकूण 59 % भाग दिसतो. पण दुसरी बाजू कधीही दिसत नाही.

चंद्र पाहताना त्यावर उठून दिसतात त्यावरची विवरं - Craters. अशनी, उल्का, कोणे काळी येऊन आदळलेले धूमकेतू यांमुळे चंद्रावर ही विवरं झाली. चंद्रावर द्रवरूपातलं पाणी नाही, हवा नाही - म्हणूनच ही विवरं अब्जावधी वर्षांपासून तशीच आहेत आणि म्हणून यात विश्वाच्या निर्मितीचा अब्जावधी वर्षांचा इतिहास गोठलेला आहे. हे म्हणजे एखाद्या गोष्टीवर आपल्या बोटांचा ठसा राहण्यासारखं आहे. चंद्रावरची काही विवरं प्रचंड मोठी - 300 km पेक्षा मोठ्या व्यासाची आहेत. याला Basins म्हटलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ग्रहमाला

आपल्या सौरमालेत फक्त सूर्य स्वतःच्या प्रकाशाने तळपतो. अंतराळातल्या इतर घटकांवर सूर्याचा हा प्रकाश आदळतो - परावर्तित होतो - म्हणून या गोष्टी आपल्याला पृथ्वीवरून दिसतात.

चंद्राचं परिभ्रमण - Rotation सुरू असताना, पृथ्वीवरून आपल्याला चंद्राच्या जितक्या भागावर प्रकाश पडलाय - तितकाच चंद्र दिसतो. अंधारातला भाग दिसत नाही. यालाच आपण चंद्राच्या कला - Phases of the moon म्हणतो. या रोज बदलतात.

अमावस्येला सूर्य - चंद्र आणि पृथ्वी एका रेषेत येतात. ही स्थिती पुन्हा यायला साधारण 29.5 दिवसांचा काळ लागतो. याला चांद्रमास म्हणतात.

याचीच दुसरी बाजू - म्हणजे चंद्रावरचा एक दिवस - हा पृथ्वीवरच्या 29.5 दिवसांइतका आहे.

शॉर्ट व्हीडिओ पाहा
व्हीडिओ कॅप्शन, आर्टेमिस 2 अंतराळात झेपावलं, नासाचं यान तब्बल 50 वर्षांनी माणसाला पुन्हा चंद्रापर्यंत नेणार

द्रावर पाणी आहे - हा शोध लावला भारताच्या चांद्रयान - 1 मोहिमेने. चांद्रयान 2 मोहिमेने याबद्दलचा अधिक डेटा पुरवला तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवापाशी गोठलेल्या स्वरूपातील पाण्याचे साठे असल्याचं चांद्रयान 3 मोहिमेने सिद्ध केलं. पण चंद्रावर आयुष्य असल्याच्या खुणा कधीही आढळलेल्या नाहीत.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.