59 व्या वर्षी पॅराग्लायडिंगचा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या 'आजीबाई' या अनुभवाबद्दल काय सांगतात?
59 व्या वर्षी पॅराग्लायडिंगचा वर्ल्ड कप जिंकणाऱ्या 'आजीबाई' या अनुभवाबद्दल काय सांगतात?
सिल्व्हिया फेरारी या इटलीच्या आहेत. त्यांचं वय आहे 58-59 वर्षं. भारतात झालेल्या पॅराग्लायडिंग वर्ल्ड कपमध्ये सिल्व्हिया जिंकल्या.
महिला गटात त्या पहिल्या आल्या. व्यवसायाने त्या भौतिकशास्त्र आणि गणिताच्या शिक्षिका आहेत.
1989 मध्ये त्यांनी पहिल्यांदा ग्लायडिंग केलं. सिल्विया क्रॉस-कंट्री पॅराग्लायडिंग स्पर्धांमध्ये भाग घेतात.
दररोजचे टास्क पूर्ण करण्यासाठी अनेक तास उडावं लागतं.
मुलं लहान असताना घेतलेला ब्रेक सोडला, तर सिल्व्हिया सतत फ्लाय करत आल्या आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)